Published On : Wed, Aug 29th, 2018

वजीरा नाका येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थानतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी २१ लाखांचा धनादेश

Advertisement

मुंबई : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बोरिवली, वजीरा नाका येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थानतर्फे २१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.

यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, देवस्थान समितीचे पदाधिकारी माजी नगरसेवक विजय दारूवाले, नगरसेवक गणेश खणकर, नितीन पाटील, नरेश भोईर, विश्वास रावते, विजय रावते, दिलीप पाटील, विशाल केणी, शशिकांत वैती उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करत असून, आता राज्यातील मंदिर समिती, ट्रस्ट, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आदींकडून मदत होत आहे. याशिवाय राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारीही एक दिवसाचा पगार देणार आहेत.

सेफगार्ड सेक्युरिटी सर्व्हिसेसतर्फेही दोन लाखांची मदत
केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सेफगार्ड सिक्युरिटी सर्व्हिसेसतर्फे दोन लाखांची मदत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आली. यावेळी सेफगार्डचे प्रमुख डॉ. बी.आर. कुमार (अग्रवाल), विकास अग्रवाल, अजय भट्टाचार्य आणि मनुभाव त्रिपाठी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement