नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून विकास ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शहरात त्यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. कसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल,असा विश्वास काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी व्यक्त केला.
इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ ताजबाग, रघुजीनगर येथे जनसभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, चंद्रकांत हांडोरे,अभिजीत वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे, अशोक धवड, गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार, अतुल लोंढे, संजय महाकाळकर, किशोर कुमेरिया, दुनेश्वर पेठे, प्रशांत धवड, वजाहत मिर्झा हे नेते उपस्थित होते.
नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला एक नेतृत्व मिळाले आहे.आता ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्त्व करत आहेत. ते महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत. जर लोकसभेत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसला विजय मिळाला. तर नक्कीच महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येईल,असेही ते म्हणाले.