Published On : Fri, Mar 31st, 2023

संजय राऊतांवर दंगलीचा गुन्हा दाखल करावा – चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याने जर पुन्हा दंगली झाल्या तर राऊतांवर दंगलीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. खैरे-राऊत यांच्यामुळे शहरातील वातावरण बिघडू शकते, असेही ते म्हणाले.

ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, संजय राऊत चिथावणीखोर विधाने करत आहेत.यापूर्वी देखील राज्यात दंगली घडल्या. मात्र, आम्ही विरोधी पक्षात असूनही राऊतांसासरखे वाह्यात वक्तव्य केले नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या शांतता आहे. मात्र सकाळी वाजत असलेला संजय राऊत नावाचा भोंगा बंद केला पाहिजे. अन्यथा जनता तो भोंगा बंद करेल. जर यापुढे छत्रपती संभाजीनगरात यामुळे जर पुन्हा दंगली घडल्या तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना गुन्हेगार करावे.

Advertisement

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून अशीच भूमिका इतरही विरोधी पक्षाचे नेते घेतील अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीने त्यांची सभा घ्यावी, आम्ही देखील वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहोत. मात्र, संजय राऊत यांनी जर भडकाऊ भाषण केले तर महाविकास आघाडीची सभा कशी होईल मला माहिती नाही, असा इशारा त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजी नगर येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असून लवकरच या घटनेतील सूत्राधर समोर येतील असेही बावनकुळे म्हणाले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवार द्यावा किंवा न द्यावा हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही आमचा उमेदवार देऊन निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही बावनकुळे म्हणाले.

सावरकर यांची गौरव यात्रा कोणत्या समाजाकरिता नाही.तर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास समाजासमोर आणण्यासाठी आहे, असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement