Published On : Thu, Apr 22nd, 2021

पोलिसांशी शाब्दिक वाद घालणाऱ्या दोन दुकांनदारावर गुन्हा दाखल

कामठी :-दैनंदिन कोरोनाचा वाढता प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तू सकाळी 11 वाजेपर्यन्त सुरू ठेवून त्यानंतर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी आज सकाळी 11 च्या नंतर शुक्रवारी बाजार चौकातील सिंधी लाईन चौकातील दोन दुकानदारांना पोलीस विभागात कर्तव्यदक्ष भूमिका बजावणारे दोन चार्ली कर्मचारी यांनो दुकान बंद करण्यास बजावले असता पोलिसांशी।शाब्दिक वाद घालून दुकान बंद करण्यास पोलिसांना मज्जाव करीत मोठ्या आवाजाने गोंधळ घालून आजूबाजूची व्यापारी वर्ग बोलावून पोलिसांशी अपमानास्पद वागणूक केल्याप्रकरणी फिर्यादी पोलीस कर्मचारी राशीद खान तसेच विजय सिन्हा यांनी स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून दुकान बंद करण्यास मज्जाव घालून पोलिसांशी अपमानास्पद वागणूक करणाऱ्या आरोपी दुकानदार श्याम हरीश मंगलाणी वय 24 वर्षे तसेच हरीश मंगलांनी वय 47 वर्षे दोन्ही राहणार बी बी कॉलोनी कामठी विरुद्ध कलम 110, 112, 117 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे

संदीप कांबळे