नागपूर : स्वारगेट बसस्थानकावर एका शिवशाही बसमध्ये नराधम आरोपी दत्ता गाडे याने २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवर सर्व स्तरावरून संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे हे प्रकरण ताजे असताना नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर एक तरुण महिलांशी गैरवर्तन करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंगेश असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात देखील आता महिलांच्या विनयभांगाचा प्रकार समोर आल्याने महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
माहितीनुसार,३ मार्च सकाळच्या सुमारास एक तरुण महिलांशी गैरवर्तन करत असल्याचं आढळून आलं आहे. हा तरुण बसमध्ये चढणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे समोर आले. यानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंगेश नामक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.