Advertisement
नागपूर : शहरातील पारडी परिसरात खेळता-खेळता १० महिन्यांच्या चिमुकल्याचा बादलीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनय संदीप परतेती असे त्या १० महिन्याच्या चिमुकल्याचे नाव आहे.
माहितीनुसार, अनय नेहमीप्रमाणे घरात खेळत होता. खेळता- खेळता तो पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. हा प्रकार काही वेळाने घरच्यांच्या निदर्शनात आल्यावर सर्वाना धक्काच बसला. अनयला त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.