कन्हान : – धर्मराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कान्द्री -कन्हान येथे संविधान प्रस्ताविका वाचन व पाठांतर स्पर्धेचे आयोजन करून संविधान दिन उत्सवात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पमिता वासनिक प्रमुख अतिथि म्हणून पर्यवेक्षक रमेश साखरकर, जेष्ठ शिक्षक सुरेंद्र मेश्राम, सुनील लाडेकर प्रामुख्याने उपस्थित होते . मान्यवारांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुरेंद्र मेश्राम यांनी संविधान निर्मिती, त्याचे महत्त्व विद्यार्थ्यां ना समजावून दिले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल सारवे, बनकर सर, सौ. गेडाम मैडम यांनी काम बघितले.
यात
प्रथम क्रमांक कु. निशिता गोडबोले, द्वितीय क्रमांक कु.भाग्यलक्ष्मी काकड़े, वैशाली नागपुरे व तृतीय क्रमांक मनश्री लक्षणे यांनी स्थान पटकविले. कार्यक्रमा चे सूत्र संचालन व आभार सुनील लाडेकर यांनी केल. यशस्वीते करिता हरीश केवटे, प्रकाश डुकरे, संतोष गोन्नाडे, हरिश्चंद्र इंगोले, विलास डाखोळे, राजूसिंग राठोड, हरीश पोटभरे, धर्मेन्द्र रामटेके, अनिरुद्ध जोशी, अनिल मंगर, विजय पारधी, उदय भस्मे, मनीषा डुकरे, विद्या बालमवार, नडे मैडम सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.