Advertisement
नागपूर महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त म.न.पा. मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव अशोक कोल्हटकर यांनी संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करुन उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
यावेळी कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अभियंता उज्वल लांजेवार, कर अधीक्षक गौतम पाटील, राजेश हाथीबेड, विनोद धनविजय, विशाल शेवारे,दिलीप तांदळे, राजकुमार वंजारी, संजय बागडे, राजेश वासनिक, सचिन टेंभूर्णे, डोमाजी भडंग, शशीकांत आदमणे, सुशिल यादव, वंदना धनविजय, राकेश चहांदे, शिवशंकर गौर आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement