Published On : Wed, Nov 13th, 2019

छोट्याश्या चुकीमुळे प्रफुलचा नाहकच गेलाजीव

Advertisement

रामटेक : दिनांक 13 नोव्हेंबर ला पहाटे 2 वाजता नगरधन *ह्या गावी एका इसमाचा नाहकच बळी गेल्याची घटना उघडकीस आली . अमोल मुतकुरे व सुरजित सिंग चिंटोले*यांनी सूचना दिली असता

पहाटे 5* वाजता वाईल्ड चैलेंजर आगनाईझेसन रामटेक सर्प मित्र व प्राणी मित्र चे सचिव *अजय मेहरकुडे व राहुल खरकाटे * यांना कॉल केला सांगितले की *प्रफुल (बाल्या) चंदंनकर* वय 44 वर्ष याना रात्री 2 चा सुमारास सर्पदंश झाला व यांचा सकाळी 4 वाजता मृत्यू झाला व त्यांना दंश केलेला साप घराचा आत मध्येच आहे असे सांगितले

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्वरित संस्थेचे *अध्यक्ष राहुल कोठेकर* याना सोबत घेत राहुल खरकटे व अजय मेहरकुडे घटनास्तडी पोहोचले सरपंच प्रशांत कामडी हे गावचा लोकांना व घरचा लोकांना समजावत शान्त राहून संयम ठेवण्याची विनंती करीत होते

साप दिवाणाचा ग्याप मधून आत शिरून दिवानाचा आत दडी मारून बसला होता तीथचा काही लोकांनी सापावर घमीला झाकुन ठेवला होता सापाला सुखरूप पकडला व तो साप *विषारी वर्गातील मण्यार /दांडेकर(Common Krait)* जातीची होता गावचा लोकांना विचारणा केली असता रात्री 2 वाजता मृतक प्रफुल हे घरी खाली झोपले होते व त्यांना काही मानेवर काही डसल्याचा भास झाला व त्यांनी शोध घेतला असता

त्यांना काही दिसले नाही ते रात्री खात्री करून घ्यान्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले व किडा डसल्याचे सांगून डॉ कडून उपचार करून घेतले डॉक्टर ला पैसे द्यायचे म्हणून घरच्या लोक घरी आले व त्यांना साप घराचा कोपऱ्यात दिसून आला घरात सापाला पाहून हालचाल झाली असता साप बाजूला दिवानात साप ग्याप मधून शिरून दडी मारून बसला साप दिसला व त्यांची धावपड सुरू झाली व गावचा काही लोकांनी त्यांना नागठाण्यावर नेले व तेथे नेताच काही क्षणात त्यांचा मृत्यू झाला कोणत्याही प्रकारची हालचाल नाही करत असल्याने गावकऱ्यांनी त्यांना शासकिय रुग्णालय रामटेक मध्ये आणले व डॉ त्यांना मृत घोषित केले

घरी झोपण्याचा आधी दरवाजा खाली फटीला कापड लावून बंद करावे व झोपताना खाटेचा ,पलंगाचा वापर करावा
खाडेचा किवा पलंगाचा वापर झाला असता तर ही घटना घडली नसती असल्याची चर्चा परिसरात होती।

Advertisement
Advertisement