Published On : Wed, Nov 13th, 2019

शहीद स्मारक प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे : महापौर

Advertisement

– ‘अमर जवान शहीद स्मारक’ बांधकामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर: अजनी चौक येथील नागपूर महानगरपालिकेच्या जागेवर माजी सैनिक संघटनेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या ‘अमर जवान शहीद स्मारक’ बांधकामाचे भूमिपूजन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १२) पार पडले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी आयोजित कार्यक्रमाला नगरसेविका लक्ष्मी यादव, ब्रिगेडियर सुनील गावपांडे, मेजर हेमंत जकाते, सुलभा जकाते, वायुसेना संघटनेचे अध्यक्ष मनोहर भातकुलकर, मेजर प्रभाकर पुराणिक, सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम कोरके, माजी सैनिक आघाडीचे शहर अध्यक्ष दिलीप जयस्वाल, महेश आंबोकर, भाजपा माजी सैनिक महिला आघाडीच्या शिला टाले, लिना बेलखोडे, आयईएसएमचे संयोजक विलास दवने उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, या जागेवर तयार होणारे अमर जवान शहीद स्मारक हे नागपुरातील प्रत्येक व्यक्तीला स्फूर्ती आणि प्रेरणा देणारे असेल. माजी सैनिक संघटनेच्या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. नागपूर महानगरपालिकेने आपल्या देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांचे स्मारक होतेय. त्यातून जवानांचे स्मरण प्रत्येक नागरिकाला व्हावे ह्या उदात्त हेतूने नागपूर महानगरपालिकेने स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली. स्मारक बांधकामात कुठेही अडचणी आल्या अथवा महापालिकास्तरावर मदत लागली तर ती आम्ही करण्यास तयार आहोत, असे अभिवचन माजी सैनिकांना दिले.

यावेळी मेजर हेमंत जकाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अमर जवान शहीद स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देत महानगरपालिकेने माजी सैनिकांच्या भावनांचा आदर केला, त्याबद्दल त्यांनी मनपाचे आभार मानले. भविष्यात अशीच मदत मिळत राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अन्य मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी महापौरांच्या हस्ते जागेची पूजा-अर्चना केल्यानंतर विधिवत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अरुणा फाले, जयश्री पाठक, सुनिता कुंभारे, जया चाफले, संजीवनी येवले, अशोक सावरकर, अरुण मोर्चापुरे, ओमप्रकाश शिरपूरकर, श्रीकांत गंगाधळे, सुनील राचलवार, प्रभाकर गभने, सचिन खेडीकर, पुंडलिक सावंत, गोविंद तितरमारे, गुंडेराव ढोबळे, मनपाच्या न्यूसन्स डिटेक्शन स्क्वॉडचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement