Published On : Wed, Nov 13th, 2019

आता घाटावर गोवऱ्या मिळणार – कालपासून अंमलबजावणी

नागपुर : नागपूर मनपा ने घेतलेल्या निर्णयानुसार वनसंपत्ती (झाडे) वाचविण्यासाठी आता नागपुरातील सर्वच घाटांवर प्रेत जाळण्यासाठी लाकडा ऐवजी अनेक जळाऊ मिश्रणा पासून बनविण्यात आलेल्या गोवऱ्या (4 x 6 ते 12 इंचाचा गोळा) मिळणार.

कालपासून हा नियम लागू झाला असून, पाहिजे तेवढं हे इंधन निशुल्क मिळतं, लाकडाचाच आग्रह धरला तर ते विकत घ्यावे लागतील.

न्यू कैलास नगरातील दोन महिला बेबी दाभणे व कल्पना सिडाम यांच्या प्रेतांना आज बसपा नेते उत्तम शेवडे, अरुण साखरकर, शंकर थुल, विनोद सहाकाटे यांच्या पुढाकाराने गोवऱ्यावर अग्नी संस्कार करण्यात आले.

लाकडासाठी 5 -10 लिटर मातीच तेल आधीही घ्यावच लागायचे आताही तो प्रश्न सुटला नाही. जळाऊ साहित्य मोफत मिळत असेल तर मातीच तेल, डीझल, डालडा चा वेगळा खर्च का? ही व्यवस्था सुद्धा मनपाद्वारे घाटावर करण्यात यावी.

लाकडे/झाडे वाचविण्याच्या मनपाच्या निर्णयाचे स्वागत.

उत्तम शेवडे, मा कार्यालय सचिव बसपा महाराष्ट्र