Published On : Wed, Nov 13th, 2019

पेंच कॅनल मध्ये १७ वर्षीय युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू

कन्हान:- कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी पेट्रोल पंपच्या समोरच्या मोठे पेंच कॅनल मध्ये १७ वर्षीय युवकांचा पाण्यात बुडवून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी सकाळी १२ च्या सुमारास घळली. चांद महादेव गुहिरे वय १७ असे मृतक युवकांचे नाव असून डुमरी खुर्द चा रहवासी आहे .

मीळालेल्या माहिती वरुण चांद आज सकाळी आपल्या घरून शेतामध्ये फुल आणायला गेल्याचे सागुन घरी परत येत असताना वाटेत असलेल्या कॅनल मध्ये हात पाय धुण्यासाठी किंवा आगोड करण्यासाठी तो बहुतेक कॅनल च्या काठी उतरला असेल आणि त्याचा तोल जाऊन पाण्यात वाहून गेला असावा असे अंदाज व्यक्त केले जात आहे. परिसरातील एका नागरिकाला कॅनल च्या बाजूला कपडे आणि चप्पल दिसून आल्यावर ही घटना उघडकीस आली.

कपड्यांचा पाहणीवरूण अंदाज लावण्यात आला की हे कपडे चांद चे आहे. लगेस घटनेची माहिती कन्हान पोलिसांना देण्यात आली व पेंच पाठबंधारे विभागाला माहिती देऊन कॅनल चे पाणी थांबोण्यात लावले.दिवसभर चांद ची पाहिनी केल्या नंतर सायंकाळी ५ च्या सुमारात चांद चे मृत्यूदेह कॅनल च्या बाहेर काढण्यात आले आहे. शव विच्छेदन करिता शासकिय दवाखानेत पाठवलेला व पुढची तपास कन्हान पोलिस चे थानेदार चंन्दकांत काळे चे मार्गदर्शनात पुढीलतपास पाली करीत आहे