Published On : Mon, Nov 11th, 2019

अनोळखी इसमाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :स्थानिक इतवारी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जी एल शेड परिसरातील एका कडूनिंबाच्या झाडाला एका अनोळखी इसमाचा पिवळ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेतल्याची घटना काल निदर्शनास आली . घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मृतकाची अजूनही ओळख पटलेली नसून मृतदेह अंदाजे जवळपास 40 दिवसांपूर्वी असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून मृतकाची उंची 5 फूट 10 इंच, तर अंगात पिवळ्या रंगाची शांडो बनियान व त्यावर कार्टुनच्या चेहऱ्याचे व त्यावर काळ्या रंगाच्या चष्माचे चित्र आहे तसेच गुडध्यापर्यंत असलेला निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट परिधान केले असून त्यावर इंग्रजीत ओरिजिनल पँथर जीन्स असे लिहिले आहे,

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उजव्या हातात काळ्या रंगाचा रबर बँड व त्यावर पांढऱ्या पिवळ्या रंगाचे चित्र काढले आहे तसेच घटनास्थळावर निळ्या रंगाचे एक चप्पल आढळली.यांदर्भात पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे तर सदर मृतका संदर्भात कुणी परिचित असल्यास रेल्वे पोलीस स्टेशन इतवारी येथे संपर्क साधावा असे आव्हान पोलीस उपनिरीक्षक राजेश वरठे यांनी केले आहे

संदीप कांबळे

Advertisement
Advertisement