Published On : Fri, Oct 18th, 2019

मेट्रो कामठीपर्यंत येणारच : नितीन गडकरी

कामठीत भरपावसात जाहीरसभेला हजारोंची हजेरी

नागपूर: भाजपा-शिवसेनेच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात कामठी शहर आणि तालुक्यात 50 वर्षात झाले नसतील एवढी कामे झाली आहेत. ही सर्व कामे पालकमंत्री बावनकुळे यांनी केली आहेत. आता मेट्रोच्या पुढच्या टप्प्यात मेट्रो कामठीपर्यंत म्हणजे ड्रॅगन पॅलेसपर्यंत येणारच आहे. त्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याची असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग व रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.

Gold Rate
12 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,100 /-
Gold 22 KT ₹ 1,02,400 /-
Silver/Kg ₹ 1,28,300/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी येथील दुर्गा चौकात आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. ऐनवेळी सुरु झालेल्या पावसामुळे कोणताही गोंधळ झाला नाही. पाऊस सुरु असतानाही नागरिक आपल्याच जागेवर गडकरींचे भाषण ऐकत होते. हजारो नागरिकांची उपस्थिती असलेल्या या सभेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री अ‍ॅड.सुलेखााई कुंभारे, ़रूपराव शिंगणे, भाजयुमोचे उपाध्यक्ष संकेत बावनकुळे, अनिल निधान, टेकचंद सावरकर, भाजपानेते विकास तोतडे, मनीष वाजपेयी, विवेक मंगतानी, रमेश चिकटे, प्रसिध्द व्यवसायी अजय अग्रवाल, डॉ. महाजन आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले- मेट्रोच्या यापुढच्या टप्प्यात रामटेक नरखेड, नागपूर वर्धा, गोंदिया चंद्रपूर अशी मेट्रो सुरु होणार असून ही चार डब्यांची मेट्रो 120 प्रति किलोमीटर प्रति तास या गतीने धावणार आहे. वाहतुकीच्या क्षेत्रात मोठे बदल आणि परिवर्तन झाले आहे. भविष्यात कामठीतील 5 हजार महिलांना रोजगार मिळेल यासाठ़ी एक कार्यक्रम आखण्यात येणार असून लहान गावांमध्ये कृषीवर आधारित लहान उद्योग सुरु करण्यात येणार आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री म्हणून केलेले काम उल्लेखनीय आहे. या कामामुळेच ते महाराष्ट्रभर ओळखले जात आहेत. बावनकुळेंची काळजी करू नका. त्यांची काळजी मी करणार आहे. तुम्ही फक्त येत्या 21 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून टेकचंद सावरकर यांना मोठा मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले की, 23 हजार कोटींचे रस्ते व अन्य कामे नितीन गडकरी यांनी या जिल्ह्यात केेले आहेत. कामठी शहर अधिक चांगले होण्यासाठी भाजपाला मतदान करा. कमळासमोरील बटन दाबून कमळ फुलवा असे आवाहन बावनकुळे यांनी केले. माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे यांनीही यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करून भाजपा उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

Advertisement
Advertisement