Advertisement
रामटेक : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रोजगार मार्गदर्शन केंद्र तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यासागर कला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा, upsc, mpsc च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे उद्बोधनकार प्रा. विनोदकुमार बागडे यांची “मी अधिकारी होणारच'” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत प्रा. बागडे यांनी विद्यार्थ्यांनी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कसे पूर्ण करू शकतो हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिल्लई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्थाविक सावित्रीबाई फुले रोजगार मार्गदर्शन केन्द्राचे समन्वयक डॉ. सुरेश सोमकुवर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना अधीकारी डॉ. गिरीश सपाटे यांनी आभार मानले.
Advertisement