Published On : Thu, Sep 26th, 2019

146 वा सालाना उर्स उत्साहाने साजरा

Advertisement

कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा दरगाह व कब्रस्तान हजरत बाबा नौशाही कादरी रहमतुलला अलैह वाली ट्रस्ट कामठी च्या वतीने येथील सुलतान सुबा हजरत बाबा अब्दुल्लाह शाह नौशाही कादरी र.अ. चे 146 वा सालाना उर्स मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या सालाना उर्स कार्यक्रमा अंतर्गत आयोजित धार्मिक पूजा पाठ सह, ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमात पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली होती तर 21 सप्टेंबर ला रात्री आठ वाजता दरबार ट्रस्ट च्या वतीने पहील्यांदा च ऐतिहासिक भव्य संदल काढण्यात आले होते .

Gold Rate
24 July 2025
Gold 24 KT 99,500 /-
Gold 22 KT 92,500 /-
Silver/Kg 1,15,500 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे भव्य शाही संदल सायंकाळी 6 वाजता द हजरत बाबा अब्दुल्लाह शाह दरबार मधून निघून शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत सुलतान सुबा हजरत बाबा नौशाही कादरी र.अ. दरबार मध्ये समापन करण्यात आले.या संदल मध्ये सहभागी असलेले आंतरराष्ट्रीय स्तराचे राजकुमार बॅण्ड पार्टी तसेच स्थानिक स्तरावरचे डी जे,मटकी पार्टी, शहनाई, घोडे , अखाडा आदी आकर्षणाचे केंद्र ठरले होते.तर 22 सप्टेंबर ला आयोजित प्रसिद्ध कववाल सरफराज चिशती यांचाकव्वाली चा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येत भाविकांनी सहभाग दर्शविला होता.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हजरत बाबा अब्दुल्लाह शाह कादरी चे मजार ट्रस्ट चे अध्यक्ष मोहम्मद आबीद भाई ताजी, सचिव हाजी अनिस शेख, उपाध्यक्ष मोहम्मद खलील ताजी, रिजवाण शेख, मोबिन राईन, कोषाध्यक्ष तौसिफ रिजवी, सदस्य गणातील सादिक नत्थु तवर, सुफी शौकत अली शाह, सौय्यद निसार, अश्फाक कुरेशी, हाजी इरफान बानानी, आदींनी मोलाची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement