एंकर..राज्य उत्पादन शुल्क विभागाने गिट्टी खदान पोलीस स्टेशन हद्दीतील भिवसन खोरी येथे दारु बंदी कायद्यांतर्गत पोलीस विभागास सोबत घेऊन संयुक्त मोहीम राबवून रुपये ५ लाख ३१ हजार ३७५ किमतीचा प्रोही बिशन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला.
सदरची विशेष मोहीम विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानूसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी राबविली.
पोलीस निरीक्षक संजय आढाव व PSI साजिद अहमद, पटले, सावंत API कोकर्डे व पोलीस स्टाफ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुभाष हनवते. दुय्यम निरीक्षक मुकुंद चीटमटवार, रवींद्र सोनोने, सागर धिडसे, राजेश मोहोड व स्टाफ सुधीर मानकर, रमेश कांबळे, शीतल सरोदे, समीर सईद, संजय राठोड, रवी इंगोले, देवेश कोटे, रवी निकाळजे, मिलिंद गायकवाड, महादेव कांगणे, ASI रामटेके इत्यादींनी सहभाग घेतला.
या कारवाईत दारुबंदी गुन्ह्यातील हातभट्टी दारु २०० लिटर, काळा गुळ १००० किलो, सडवा / रसायन २२ हजार ५०० लिटर, लोखंडी ब्यारेलस ५० नग, रसायनाने भरलेले : ५० लिटर क्षमतेचे २५० ड्रम, जर्मन भांडी घमेली १५ नग, चाटू १५ नग, दांडी पिप १५ नग, होस पाईप १० नग, हातभट्टी दारु ने भरलेले : २० लिटर क्षमतेचे २५ क्यांस, वजन काटा इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाई मध्ये पंजाबराव गजबे, लताबाई कांबळे, पाखरा बाई यादवकर व रंजना सुधाकर काळबांडे या चार आरोपी विरूद्ध दारु बंदी गुन्हा अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत