Published On : Sat, Aug 31st, 2019

कामठी तालुक्यात पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Advertisement

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला

कामठी :- कृषी उत्पन्न बाजार समिती व पोळा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने सहकार महर्षी बाबासाहेब केदार मार्केट यार्ड येथे पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याप्रसंगी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे यांचे हस्तेबैलजोडीची पूजा आरती करून शेतकऱयांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रमोद महले , माजी आमदार देवराव रडके,ठाणेदार किशोर नगराळे ,रामेश्वर बावनकर ,माजी नगराध्यक्ष प्रमोद मानवटकर, अंकुश बावनकुळे, विष्णू चनोले, राजकुमार गेडाम, लालसिंग यादव वैशाली मानवतकर,गोपालसिंग यादव,टिळक गजभिये,कृपाशंकर ढोके, यम जबार, उपस्थित होते ,येरखेडा येथे नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते बैलजोडीची पूजा-आरती करून पोळा उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच मंगला कारेमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता रंगारी, माजी सरपंच मनीष कारेमोरे ,वसंतराव महल्ले, बाबा महल्ले, माजी सभापती वसंतराव काळे ,रमेश गवते पोलीस पाटील बबनराव काळे, शरद भोयर ,अमित भोयर, भास्कर बर्शिंगे, राजेश बन्सीगे, घनश्याम नवधींगे, प्रवीण लुटे, सुमेध दुपारे उपस्थित होते खैरी येथे सरपंच मोरेश्वर कापसे यांचे हस्ते बैलजोडीची पूजा-आरती करून पोळा उत्सव वाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच नथू रघताटे , खैरी ग्रा प उपसरपचं तसेच समस्त ग्रा प सदस्य , माजी सरपंच धर्मराज आदमने, माजी सरपंच किशोर धांडे ,उपसरपंच विनाताई रघटाते सह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement