Published On : Fri, Aug 30th, 2019

आगामी सणोत्सवात कायदा व सुव्यवस्था बाधीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे -तहसीलदार अरविंद हिंगे

Advertisement

शांतता समितीच्या बैठकीत गाजला डी जे वाजविण्याचा मुद्दा

कामठी :- आगामी होणाऱ्या सण उत्सवादरम्यान शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची आव्हान कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले .याप्रसंगी चर्चेत विसर्जन दरम्यान मिरवणुकीत डी जे वाजविण्याचा मुद्दा हा चांगलाच गाजला.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी ठाणेदार संतोष बकाल, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता नासरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता रंगारी ,नायब तहसीलदार रंणजीत दुसावार ,नगरपरिषदेचे स्वास्थ निरीक्षक विजय मेथिया, नगरसेवक अफरोज उबेद, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत चौबे, राकेश फेंडर, सुदाम राकडे, गुप्त विभागाचे मयूर बन्सोड, ओमप्रकाश खंडाते , महेश नायक आदी उपस्थित होते.

शांतता समितीच्या सभेत रनाला येथील बाल्या सपाटे ,येरखेडा येथील अरुण पोटभरे, वारिसपुरा येथील रवी चमके यांनी गणेश उत्सव दरम्यान भारनियम, डीजे वाजवण्याची परवानगी, विसर्जन मिरवणूक व कामठी शहरातील विविध मार्गावर पडलेले खड्डे बुजवीणे ,विविध मार्गावरील बंद असलेले पथदिवे मुद्दे सभेत ठेवले असता तहसीलदार अरविंद हिंगे यांनी विविध मुद्दे प्रत्येक विभागा मार्फत सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले, विविध धर्म समाजातील नागरिकांनी शासनाचे नियमाचे पालन करून व एकत्र येऊन विविध सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करून शहरात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार संतोष बकाल यांनी केले संचालन पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांनी केले व आभार प्रदर्शन मोहन खंडाते यांनी मानले सभेला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते

Advertisement
Advertisement
Advertisement