Published On : Fri, Aug 30th, 2019

छावणी परिषद च्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला मंजुरी ..

Advertisement

कामठी : कामठी कैंटोनमेंट बोर्ड कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छावणी परिषद भागात स्वतंत्र जलपूर्ती योजनेकरिता विशेष सभा लावण्यात आली तसेच छावणी परिषद भागात विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली यात महत्त्वाचे म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून पाणीपुरवठा योजना विचाराधीन होती

त्या अनुषंगाने शहरातील नागरी भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्याचा दर्जा वाढविण्याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत कामठी छावणी परिषद पाणीपुरवठा प्रकल्पाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची तांत्रिक मान्यता मिळाली असून ही योजना 10 करोड 38 लाख रुपयाची आहे हा विषय कित्येक दिवसापासून विचाराधीन होता पण तेथे स्थानीय नागरिकांची गरज पाहता शासनाने त्वरित मंजुरी दिल्याचे मीटिंगमध्ये पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

तसेच शासन पत्रानुसार काही बंधनकारक सुधारणा वैकल्पिक सुधारणा निधी वितरणाची कार्यपद्धती प्रकल्पाचे त्रयस्थ तांत्रिक परीक्षण प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती याबाबतीतही माहिती देण्यात आली याप्रसंगी छावनी परिषद चे अध्यक्ष ब्रिगेडियर पंकज मल्होत्रा कामठी छावनी परिषद चे सी ई ओ अभिजीत सानप, छावनी परिषद उपाध्यक्ष दिनेश स्वामी नगरसेवक दीपक सीरिया,विजयालक्ष्मी राव,सीमा यादव, सुनील फ्रांसिस,चंद्रशेखर लांजेवर,छावनी परिषद माजी उपाध्यक्ष गोपाल सिंह यादव,राजेश खंडेलवाल,कमल यादव (लालू), गोपाल सीरिया, प्रमेंद्र यादव, अरुण पोट्भरे,अजय पाचोली,राजा देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते,