Published On : Wed, Aug 28th, 2019

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार मनपाचे नगरभवन

Advertisement

पर्यावरणपूरक इमारतीच्या बांधकामाबाबत आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे माजी महापौर प्रवीण दटके यांचे निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे महाल येथील राजे रघुजी भोसले नगरभवन पुरातन स्मृती जपतानांचा अत्याधुनिक होणार आहे. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण व पर्यावरणपूरक असलेल्या राजे रघुजी भोसले नगरभवनचे संकल्पचित्र व त्याचा आराखडा मंगळवारी (ता.२७) माजी महापौर प्रवीण दटके यांच्या समक्ष सादर करण्यात आला. पार्कींग, पदाधिकारी व अधिकारी यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, कॅन्टींन, डायनिंग सभागृह, अत्याधुनिक उपकरणे व संपूर्ण सौर उर्जेवर संचालित इमारत शहराच्या सौंदर्यात भर घालणारी ठरणार आहे. या इमारतीच्या बांधकामाबाबत आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन पुढील कार्यवाही करा, असे निर्देश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपाच्या प्रस्तावित व अपूर्ण असलेल्या बी.ओ.टी. पी.पी.पी., केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महापौरांद्वारे प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत गठीत समितीची बैठक मंगळवारी (ता.२७) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीत माजी महापौर प्रवीण दटके यांच्यासह आमंत्रित सदस्य स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, निगम सचिव हरीश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सोनाली कडू, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, मनोज गणवीर, अमीन अख्तर, राजेंद्र रहाटे, ए.एस. मानकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, विजय हुमने, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इस्राईल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी राजे रघुजी भोसले नगरभवनच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या आराखड्यासह ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, सोक्ता भवन, सेंट्रल मॉल, जिजाउ शोध संस्थान, साने गुरूजी हायस्कूल यांच्या कार्याचाही समिती अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी आढावा घेतला.

राजे रघुजी भोसले नगरभवनच्या प्रस्तावित नवीन इमारतीमध्ये सुमारे २५० ते ३०० चारचाकी वाहनांसह दुचाकी वाहनांसाठीही पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. चार मजली इमारतीमध्ये अद्ययावत मुख्य सभागृहासह विविध बैठकींसाठी सुमारे २०० ते २५० आसनक्षमता असणारे सभागृह, महापौर, उपमहापौर, आयुक्त यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग व कक्षाची व्यवस्था, याशिवाय सत्तापक्ष नेता, विरोधी पक्षनेता यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तसेच सत्तापक्ष व विरोधी पक्षातील पदाधिका-यांसाठी स्वतंत्र कक्ष, दोन्ही पक्षांच्या महिला पदाधिका-यांसाठी स्वतंत्र कक्ष, अधिका-यांसाठी कक्ष, ग्रंथालय, छतावर सौर उर्जा पॅनल, कॅन्टींन, डायनिंग हॉल अशी व्यवस्था राहिल. मुख्य सभागृह हे पूर्णत: नवीन तंत्रज्ञानाने अद्ययावत असून सभागृहामध्ये महापौरांच्या खुर्चीच्या बाजूला वर दोन स्क्रीन, पत्रकारांसाठी वेगळे दालन आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित कामाबाबत येणारे अडथळे दूर करुन आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी समिती अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.

बैठकीमध्ये एल.ए.डी. लाईट प्रकल्प, सिमेंट क्राँक्रीट रस्ते टप्पा १,२ व ३, सिमेंट रस्ते जंक्शन पॉईंटचा विकास, डी.पी. रस्ते, (केळीबाग रोड, राजमी पहेलवान रस्ता, जुना भंडारा रोड, पारडी रोड, सोमलवाडा रस्ता, रमना मारोती रस्ता), बांधकाम प्रकल्प : ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार महाल, बुधवार बाजार सक्करदरा, कमाल टॉकीज जवळील प्रकल्प, टाउन हॉल बांधकाम, नवीन महाल झोन ऑफीस, स्व. प्रभाकरराव दटके रुग्णालय, आयसोलेशन हॉस्पीटल, मातोश्री जिजाउ उद्योजिका भवन, यशवंत स्टेडियम, गांधीसागर तलाव, नाईक तलाव, लेंडी तलाव, सोनेगाव तलाव, नागनदी प्रकल्प, पर्यावरणपूरक दहनघाट, एल.पी.जी. शववाहीनी ब्रिकेट्स शवदहन, नागपूर महानगरपालिका बॅटलिंग प्लाँट, साने गुरूजी शाळा, राहतेकर वाडी आदी विषयांचा समिती अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके यांनी आढावा घेतला.

सर्व कामांचे निविदा लवकर काढून कार्यांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement