Published On : Wed, Aug 28th, 2019

टी बी च्या आजराला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सैलांब नगर परिसरात मागील दहा दिवसात एका तरुणाने रेल्वेगाडी समोर येऊन आत्महत्या केली त्यानंतर भरदिवसा एका तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच सैलाब नगर परिसरातील एका फळ विक्रेता तरुणाने टी बी सारखा आजार तसेच आर्थिक कर्जाला कंटाळून घरात कुणी नसल्याची संधी साधून घरातील लाकडी बललीला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडे सहा पूर्वी घडली असून मृतक तरुणाचे नाव रईस अहमद रहीम अहमद वय 32 वर्षे रा सैलाब नगर कामठी असे आहे.

प्राप्त माहिती नुसार सदर मृतक तरुण हा टी बी सारख्या आजाराने ग्रस्त होता त्याच्याच फळ विक्रीच्या व्यवसायासाठी घेतलेली कर्जाची रक्कम परतफेड न केल्याने सहूकाराचा पैस्याच्या मागणीसाठी होत असलेला तगाद्यात चिंताग्रस्त होऊन गेला होता या त्रासाला कंटाळून घरमंडळी बाहेर गेल्याचे संधि साधतात गळफास घेऊन जगाचा कायमचा निरोप घेतला .

यासंदर्भात फिर्यादी मृतक ची आई आशाआरा रहीम अहमद वय 45 वर्षे रा सैलांब नगर कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी