Published On : Mon, Aug 19th, 2019

दोन तासात मोबाईल चोरीचा छडा

Advertisement

रेल्वे स्थानकावरील मध्यरात्रीची घटना,आरपीएफची कारवाई

नागपूर: विश्रांती घेत असलेल्या प्रवाशाची बॅग चोरट्याने लंपास केली. या बॅगमध्ये दोन मोबाईल होते. ही घटना मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेचा छडा आरपीएफ जवानांनी केवळ दोन तासात लावला. कायदेशिर कारवाईनंतर आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या हवाली केले. रोशन प्रमोद मेश्राम (२६, रा. हिवरीनगर) असे मोबाईल चोराचे नाव आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोबरवाही, तुमसर निवासी महेश श्रीराम चौधरी (३६) हे कामानिमीत्त नागपुरला आले. काम आटोपल्यानंतर परत जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचले. मात्र, रात्र झाल्यामुळे त्यांनी रेल्वे स्थानकावरच मुक्काम केला. लोहमार्ग पोलिस ठाण्याशेजारी असलेल्या रेल्वे तिकीट केंद्रपरिसरात ते झोपले होते. या संधीचा फायदा घेत रोशन मेश्राम याने त्यांच्या उशाजवळ असलेली बॅग चोरली. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास महेश यांची झोप उघडली असता त्यांना बॅग दिसली नाही. आता काय करावे म्हणून त्यांनी थेट आरपीएफ ठाणे गाठले. सीसीटिव्ही नियंत्रण कक्षातील प्रधान आरक्षक विनोद साखरे आणि आरक्षक सोनवणे यांनी सीसीटिव्हीत पाहणी केली असता रोशन हा बॅग चोरून नेताना दिसला.

लगेच या घटनेची माहिती क्राईम डिटेक्शन पथकाला देण्यात आली. पथकातील सदस्य शशीकांत गजभिये, नितेश ठमके आणि डी.एस. कवर यांनी दोन तासात आरोपीला हुडकून काढले. तो बॅग घेऊनच स्टेशन बाहेर जात होता. बॅगच्या रंगावरून त्याची चौकशी केली. त्याला ठाण्यात आणले. उपनिरीक्षक दिलीप सिंह यांनी त्याची चौकशी केली. त्याने बॅग चोरीची कबूली आरपीएफला दिली.

आरपीएफने कायदेशिर कारवाई नंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. ही कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकरनाथ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Advertisement
Advertisement