Published On : Fri, Aug 16th, 2019

स्वातंत्र्यदिनाचा 72 वा वर्धापन दिन हर्षोल्हासात साजरा

Advertisement

कामठी :-15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला यानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा भारतोय स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन कामठी तालुक्यात ठिकठिकाणी हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.यानुसार तालुक्यातातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच ठिकठिकानो ध्वजारोहण करून मानवंदना वाहण्यात आली.

यानुसार कामठी तहसील कार्यालयात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्याअ समवेत तालीम करून तिरंगी झेंड्याला सलामी दिली.यावेळी स्वातंत्र्य सैनिक रतनलाल पहाडी, बिडिओ सचिन सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारि मंजुषा राऊत, उपकार्यकारी अभियंता अललेवार, पोलीस निरीक्षक संतोष बाकल, नायब तहसीलदार रणजित दुसावार, नायब तहसीलदार गणेश जगदाडे, नायब तहसिलदार ऊके, यासह माजी आमदार देवराव रडके, वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत चौबे, श्यामलाल शर्मा, दिलीप मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी तहसील कार्यालयात स्वातंत्र्य सैनिक रतनलाल पहाडी यांचा सत्कार करण्यात आला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी पंचायत समितो कार्यालयात बीडीओ सचिन सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सहाययक गट विकास अधिकारी कोल्हे, पंचायत समिती गटशिक्षण अधिकारि कश्यप सावरकर, अरविंद अंतुरकर, विस्तार अधिकारि शशिकांत डाखोळे, यासह कार्यालयीन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस नोरीक्षक संतोष बाकल तर जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून तिरंगी झेंड्याला मानवंदना वाहण्यात आली याप्रसंगी पोलीस स्टेशन चे समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कामठो नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मुख्याधिकारी रमाकांत डाके, न प उपाध्यक्ष , नगरसेवकगण तसेच न प कार्यालयिन अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते. येथील मोटर स्टँड चौक स्थित पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात कृष्ण पटेल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी इंदलसिंग यादव, हुसैन अली, शुभम ठाकूर, ऍड पकज यादव , कोशोर खेडकर आदी वृत्तपत्र विक्रेता संघातील समस्त अधिकारी व सदस्य गण उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement