Published On : Tue, Aug 13th, 2019

पुरग्रस्ताकरिता कॉंग्रेस कमेटी व युवक कॉग्रेस व्दारे मदत गोळा

Advertisement

कन्हान : – महाराष्ट्रातील पुरग्रस्ता करिता कॉंग्रेस कमेंटी व युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गहु, तादुंळ, कपडे व इतर अत्याआवश्यक साहित्य आणि नगदी रूपये गोळा करून लवकरात लवकर मदत पाठविण्यात येणार आहे.

नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी च्या वतीने नागपूर जिल्ह्यातील तालुक्या मधुन कोल्हापुर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याकरिता पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहर, कान्द्री, टेकाडी परिसरातुन मा. राजेंद्र मुळक माजी मंत्री व अध्यक्ष ग्रामीण काँग्रेस कमिटी नागपूर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत गहु, तांदुळ, कपडे, इतर अत्यावश्यक साहित्य (वस्तू) आणि नगदी स्वरूपात रूपये लोकांन कडुन गोळा करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश डोमकी, नरेश बर्वे, राजेश यादव, अशोक चिखले, बळवंत पडोळे, बबलू बर्वे, देविदास जामकर, रामभाऊ ठाकरे, गणेश माहोरे, सीताराम भारद्वाज, श्याम पिपल्वा, अमोल प्रसाद, मयंक देशमुख, शक्ती पात्रे, मिलिंद वाघधरे, इमरान शेख, अनिल मेश्राम, शरद वाटकर, संदीप यादव, रवी रंग, रिता बर्वे, आशाताई राऊत, दलजीत कौर जंबे, रंग मॅडम, पुष्पाताई भेलावे, शेषराव देशमुख, राजु कोठारु, आशिष थोटे, चेतन देशमुख, मोहसीन खान, मनीष भिवागडे, आकीब सिद्धीकी, अनुप सावरकर, दीपक वर्मा, बैसाखू जनबंधू, महेश झोडवणे सह पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस व्दारे निखिल दा.पाटील अध्यक्ष रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस, आशिष हुड अध्यक्ष पारशिवनी तालुका यु.कॉंग्रेस यांचा नेतृत्वात दि.१२ ऑगस्ट ला पूरग्रस्तांसाठी कन्हान येथे मदत दिंडी काढुन मदत गोळा करण्यात आली. यात सारंग काळे, निखिल बागडे, हर्षल निंबाळकर, रुपेश मेश्राम, आकाश कडु, विक्की शरणागत, राहुल टेकाम, चेतन कुंभलकर, ओम मस्के, निखिल बागडे, छगन शेंदरे आदी युवा कार्यकर्त्यानी सक्रिय सहभाग घेऊन पुरग्रस्ताकरिता मदत गोळा केली.

Advertisement
Advertisement