Published On : Tue, Aug 13th, 2019

महावितरणच्या प्रादेशिक संचालकांचे स्पष्ट निर्देश

Advertisement

वीजबिल वसुलीची कार्यक्षमता वाढवा

नागपूर: वीजबिल वसुलीची कार्यक्षमता वाढवा, वरिष्ठ अधिका-यांनी ग्राहकांच्या नियमितपणे भेटी घेतल्यास वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढेल, वसुली कार्यक्षमता न वाढल्यास नाईलाजास्त्व संबंधितांवर कारवाई करावी लागेल असा स्पष्ट ईशारा महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिला. नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलातील सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या संयुक्त आढावा बैठकीला संबोधित करतांना ते बोलत होते.

वसुली वाढविण्यात आपण कुठे कमी पडतो याचे यावर चिंतन करा, वसुली वाढविण्यात अपयशी ठरल्यास संबंधित वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देशही दिलीप घुगल यांनी दिले. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. याबैठकीत ग्राहकांकडील वीजबिलांची वसुली कार्यक्षमता, थकबाकी, वीजहानी, विविध उपाययोजनांतून वाढलेली वीजविक्री आदी विषयांचा विस्तृत आढावा घेण्यात आला.

महावितरणविरोधातील लोकपाल यांच्याकडील तक्रारींवर अभ्यासपुर्ण युक्तीवाद करणा-या हिंगणघाट विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांचा प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांच्या हस्ते यावेळी यथोचित सत्कारही करण्यात आला. याबैठकीला मुख्य अभियंते सुहास रंगारी, सुखदेव शेरकर, सुचित्रा गुजर, अनिल डोये, हरिश गजबे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे यांच्यासह पाचही परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, वित्त व लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते