कामठी: कामठी तालुक्यातील दुययम निबंधक कार्यालयातून भूखंडाचे खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असून या रजिस्ट्री कार्यालयात दिवसेंदिवस होत असलेली नागरिकाची गर्दी व त्यातच पडत असलेली अपुरी जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल शनिवारला तहसील कार्यालय परिसरात 1 कोटी 45 लक्ष रुपयाच्या निधीतून या रजिस्ट्री कार्यालय बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सोबतच नजीकच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण सुदधा करण्यात आले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे, एसडीओ वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, मुद्रांक उपजिल्हाधीकारी हांडा, उपजिल्हाधिकारि प्रकाश पाटील, दुययम निबंधक अधिकारी अलका फेंडर , किशोर बन्सोड, मनोज शेवटेकर , मीलिंद जोशो, आकाश निकोसे, शोभाताई वंजारी, ऍड आशिष वंजारी, संजय मेश्राम, मनीष रामटेके, रोहन देशभ्रतार आदी उपस्थित होते.
– संदीप कांबळे ,कामठी










