Published On : Mon, Jul 15th, 2019

करंट लागून युवकाचा अकस्मात मृत्यू

Advertisement

टाकळघाट येथील घटना

टाकळघाट: किराणा दुकानाचे शेड तयार करत असताना कामगाराला अचानक विद्युत करंट लागल्याने खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना शनिवार दि १३ जुलै ला सायंकाळी ६:०० वाजता दरम्यान टाकळघाट येथील विकटु बाबा प्रतिष्ठानात बुटी बोरी औधोगिक क्षेत्र पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.सुनील बावणे(३२) रा बुटी बोरी असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सविस्तर वृत्त असे की,सुनील हा बुटी बोरी औधोगिक क्षेत्रातील के इ सी इंटरनॅशनल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता.त्याचे वर्ष भरापूर्वीच लग्न झाले असून त्याची पत्नी ही गरोदर आहे.कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या पगारात त्याचे कसेबसे घर चालायचे परंतु त्याच्याकडे पत्नीची डिलिव्हरी असल्याने येणाऱ्या खर्चाची तजवीज म्हणून त्याने टाकळघाट येथील रत्नपाल फुलझेले यांच्या दुकानाच्या शेड च्या कामाचा दहा हजार रुपयात कंत्राट घेतला होता.

घटनेच्या दिवशी तो आपल्या दोन सहकाऱ्या सोबत दुपारपासून शेडचे काम करीत असतानाच पूर्ण शेड तयार झाल्यावर शेवटचा बोल्ट लावत असतांना अचानक त्याला विद्युत करंट लागल्याने तो खाली पडला.सुनील खाली पडल्यामुळे त्याच्या सहकारी कामगारांनी त्याला तातडीने टाकळघाट येथील खाजगी दवाखान्यात नेले.परंतु डॉक्टर ने त्यांना चौधरी हॉस्पिटल बुटी बोरी येथे नेण्यास सांगितले असता त्यांनी चौधरी हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टर ने तपासून त्याला मृत घोषित केले.

संदीप बलवीर,बुटिबोरी

Advertisement
Advertisement