काटोल : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिलेल्या आवाहनानुसार काटोल तालुका तॄतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे 20 कर्मचारी आज दिनांक 10 ला एक दिवसासाठी सामुहिक रजेवर गेले होते. उद्या दिनांक ११ व १२ जूलै रोजी लेखणी बंद ठेऊन नीदर्शने केली जाणार आहे.
तसेच १५ जूलै पासून बेमूदत काम बंद आंदोलनाचा इशारा काटोल येथील महसूल संघटनेने दिला आहे. महसूल संघटनेच्या संप दिनांक 8 व 9 जुलै पासून सुरू करण्यात आला असून त्या दोन दिवशी काळ्या फिती लावून काम करून दुपारच्या सुट्टीत निदर्शने केल्या गेली.
जूनी पेंशन योजना लागू करणे, पांच दिवसाचा आठवडा, कनिष्ठ लिपिक ते अव्वल कारकून व तहसीलदार पदापर्यत सेवाज्येष्ठते प्रमाणे नियुक्त्या करण्यात यांव्या व इतर मागण्यांसाठी संप असल्याचे संघटनेचे तालूका अध्यक्ष व्हि.एल.नेउलकर.तसेच योगीता डांगोरे यांनी स्पष्ट केले.