Published On : Mon, Jul 8th, 2019

नाले सफाई धोरण ठरवून अहवाल सादर करा!

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : नाले सफाई आढावा बैठक

नागपूर : अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसादरम्यान शहरातील विविध वस्त्यांमध्ये आणि सखल भागात पाणी साचण्याचे अनेक कारणे आहेत. नाले सफाई वेळोवेळी झाली अथवा नाल्यांमध्ये कचरा, हॉटेल्सचे शिळे अन्न, घरातील खरकटं यासह अन्य कचरा साचू नये यासाठी यंत्रणेने नाले सफाईचे धोरण ठरवावे. त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

Gold Rate
18 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,900 /-
Gold 22 KT ₹ 1,02,200 /-
Silver/Kg ₹ 1,26,500/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई धोरण ठरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिले. त्या अंतर्गत सोमवारी (ता.८) शहरातील नाले सफाई व पावसाळी नाली सफाई आढावा व धोरण ठरविण्याकरीता महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, दुर्बल घटक समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, कर आकारणी व कर संकलन समिती उपसभापती सुनील अग्रवाल, धंतोली झोन सभापती लता काडगाये, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, लकडगंज झोन सभापती राजकुमार साहु, नगरसेवक निशांत गांधी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरीश राउत, गणेश राठोड, राजू भिवगडे, सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दहाही झोनमधील पावसाळ्यात होणारा त्रास, नाल्यांची समस्या व त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी सर्व झोनच्या सहायक आयुक्त व झोनल अधिका-यांनी मागील वर्षी ज्या वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साचले होते, त्या संपूर्ण ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती दिली.

शहरातील विविध भागातील दुकानदार व मंगल कार्यालयातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. हा कचरा संबंधित मालकांकडून अनधिकृतरित्या कुठेही टाकला जातो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. या कच-याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी शहरातून कचरा संकलीत करणा-या कनकडेच हा कचरा देण्यात यावा, यासाठी संबंधित मालकांना पत्र देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. झोनमधील स्वच्छता व अतिक्रमणाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक झोनला एक पोकलेन व टिप्पर देण्यात येत आहे. मंगळवार(ता.८)पासून पोकलेन व टिप्पर झोनमध्ये दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मनपाच्या उपद्रव प्रतिबंधक पथकाद्वारे सर्वत्र कारवाई सुरू आहे व दंडही वसूल करण्यात येत आहे. मात्र केवळ नागरिकांकडून दंड वसूल करणे हाच पथकाचा उद्देश नसून लोकांमध्ये जनजागृती व्हावी या भूमिकेतून कार्य करा. याशिवाय उपद्रव प्रतिबंधक पथकामधील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावेत, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या तळभागात साचणा-या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो. या इमारतीमुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सदर प्रकरण न्यायालयीन असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात इमारत मालकाकडून शपथपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी अधिका-यांकडून देण्यात आली. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचत असतो. या पाण्यामध्ये अनेक वाहने फसतात. ही स्थिती टाळण्यासाठी जास्त पाउस झाल्यास सदर मार्ग बंद ठेवण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

प्रत्येक झोनमध्ये निर्माण करण्यात येणा-या ट्रान्सफर स्टेशनसाठी पाच झोनमध्ये जागा निश्चीत करण्यात आली आहे. उर्वरित झोनमधील जागा लवकरात लवकर निश्चीत करून आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करणे, शहरातील चेंम्बरची नियमीत सफाई करणे याबाबतही निर्देश महापौरांनी दिले. पावसाळ्यात नाल्यामध्ये साचणा-या पाण्यामुळे निर्माण होणारा धोका आधीच लक्षात होउन नागरिकांना सावध करता यावे व मनपालाही आवश्यक ती कार्यवाही करता यावी यासाठी ‘फ्लड लेव्हल मार्कींग’ करण्यात यावे व यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. याशिवाय नेहरूनगर झोनमध्ये अवैधरित्या नाल्यावर बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामासंदर्भात त्वरीत कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नाल्यांची नियमीत स्वच्छता व्हावी व यामध्ये कचरा टाकण्यापासून प्रतिबंध लावण्यात यावा यासाठी नाल्यावर आवश्यक तेव्हा उघडता व बंद करता येणारे लोखंडी आवरण लावणे तसेच शहरातील पाण्याच्या लाईन, सिवर लाईन, ट्रंक लाईन यांची सहजतेने माहिती व्हावी व नागरिकांच्या सुविधेचे काम अडथळ्याविना करता यावे, यासाठी झोनल अधिकारी, अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांच्याशी समन्वय साधून सर्व नगरसेवकांनी प्लेन टेबल सर्वे करावे, अशी संकल्पना यावेळी ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडली.

Advertisement
Advertisement