Published On : Mon, Jul 8th, 2019

महावितरण चा भोंगळ कारभार

Advertisement

जून महिन्यात लावले जास्तीचे विद्युत बिल
भोंगळ कारभारविरोधात सहाय्यक अभियंत्याला निवेदन

,बुटिबोरी:- सध्या बुटी बोरी भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण (महावितरण) कंपनीने अनेक विद्युत ग्राहकांना जास्तीचे विद्युत बिल देऊन आपल्या भोंगळ कारभाराची प्रचिती आणून दिली.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जून महिन्याचे बिल बघून अनेक ग्राहकांनी आपले डोळे विस्फारले असून अनेक ग्राहकांना नेहमीच्या व खर्च झालेल्या विद्युत पेक्षा दाम दुप्पट वीज बिल पाठविल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे.गोदावरी नगर येथील सुमित कांबळे यांना भर उन्हाळ्यात मे महिन्यात २६०० रु विद्युत बिल आले होते.त्यांना दर महिन्याला १५०० ते २००० रुपयांपर्यंत विद्युत बिल येत असते परंतु जून महिन्यात त्यांना अचानक ९३०० विद्युत बिल आल्याने त्यांना धक्काच बसला.

विशेष म्हणजे बुटी बोरी व परिसरात वीज कधी जाईल याचा काहीही नेम नाही.प्रत्येक बुधवारी दुरुस्तीच्या नावावर दिवसभर वीजपुरवठा बंद केल्या जात असल्याचेही अनेक ग्राहकांनी सांगितले.नवीन वीज जोडणी करिता महिना महिना भर डिमांड नोट दिली जात नसल्याचेही अनेकांची समस्या आहेत.तरी संबधित समस्या ह्या लवकरात लवकर निकाली काढण्या करीता भीम पँथर चे जिल्हा अध्यक्ष सुमित कांबळे यांचे नेतृत्वात सहाय्यक अभियंता मेहुणे यांना निवेदन दिले.

जर या समस्या लवकर मार्गी लागल्या नाही तर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्याचे संकेतही देण्यात आले.निवेदन देतेवेळी सचिन घोडे,नंदेश वाघमारे,चेतन चंदेल,रिहान शेख,नाना धुर्वे,कैलास मडावी,सौरव शेलकर व अनेक जण उपस्थित होते.

संदीप बलविर,बुटिबोरी,नागपुर

Advertisement
Advertisement