Published On : Mon, Jul 8th, 2019

मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात मुख्यमंत्री सडक योजनेचा फज्जा

Advertisement

प्रा्कलनात रेती वापरायचे असतांना सर्रास केला डस्ट चा वापर,कार्यकारी अभियंत्याची कार्यवाहिवर लक्ष

(टाकळघाट) :- देशातील प्रत्येक गाव हे शहराशी जोडल्या जावे म्हणून देशात प्रधानमंत्री सडक योजना राबविल्या गेली.महाराष्ट्रातही प्रधानमंत्री सडक योजनेच्या धर्तीवर स्वतः मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मोठ्या थाटामाटात मुख्यमंत्री सडक योजना हाती घेऊन दुर्गम आणि शहराला जोडण्यासाठी ग्रामीण भागात रस्त्याचे काम सुरू केल्याचे दृश्य सध्या पूर्ण महाराष्ट्रात दृष्टीपथास येत आहे.

 

सद्यस्थितीत हिंगणा तालुक्यातील लखमापूर ते कीन्ही(भांसोली) या दोन गावांना जोडणारा समृद्धी महामार्गाच्या लगत राज्य मार्ग क्रं ३४४ आणि
प्र. जि .मा . कान्होलिबारा – टाकळघाट – बुटीबोरी या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुरू आहे याच रस्त्याने या परिसरातील शेकडो कामगार बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहती मध्ये कामाला येतात त्यांच्या दृष्टी ने हा रस्ता येण्याजण्यासाठी सोयी चा आहे .सदर २.१८ किमी रस्त्याचे काम के के कन्स्ट्रकॅशन कंपनीला १०७ लक्ष रुपयाला दिले आहे.

सदर काम करीत असलेले कंत्राटदार हे शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार काम करीत नसून प्राकलना मध्ये रेतीचा वापर करण्याचा स्पष्ट उल्लेख असताना पुलाच्या काँक्रेट मध्ये डस्ट चा वापर करून नियमांचे उल्लंघन केले आहे.

रोडच्या कामात होणारा गैरप्रकार हा कंत्राटदार जाणूनबुजून करीत असल्याचे खडकी येथील काही जागृत नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी संबधित कामाची तक्रार कार्यकारी अभियंता यांना दिली.कार्यकारी अभियंता यांनी लगेच आपल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करून कंत्राटदार यांना तात्काळ काम बंद करण्याच्या सूचना दिल्या.व मटेरियल टेस्टिंग करिता पाठविले.

त्यानंतरही कंत्राटदाराने पुलाच्या कामात सर्रासपणे डस्ट चा वापर करून कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाची अवहेलना केलेली दिसून येते.कंत्राटदाराचे हे नफेखोरी धोरण पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असून सबब कामाकडे वरिष्ठांनी गंभीरपणे लक्ष घालून कंत्रातदारावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

संदीप बलविर,बुटिबोरी,नागपुर