कन्हान : – बेले सर एज्युकेशन संचालित आरती डॉन्स अँकेडमी कन्हान व्दारे आयोजित उन्हाळी शिबीरात विद्यार्थ्यां च्या विविध पैलुंना प्रोत्साहन देत बक्षीस वितरणाने उन्हाळी शिबीराचा समारोप करण्यात आला.
बेले सर एज्युकेशन हॉल शिवनगर कन्हान येथे बेलेसर एज्युकेशन संचालित आरती डॉन्स अँकेडमी व्दारे १ मे ते १० जुन२०१९ पर्यंत ४० विद्यार्थ्यांचे उन्हाळी शिबीर आयोजित करून नुत्य सादरी करण, विविध स्पर्धा, इंग्लिश स्पिकींग कोर्स, वेदीक मँथ्स,अँबकस ट्रेनिग व रायटिंग इनहॉसमेंट प्रोग्राम व्दारे विद्यार्थ्यांच्या विविध पैलुंना विकसित करण्याचा यशस्वी पर्यंत करण्यात आला.
बुधवार (दि.१२) ला उन्हाळी शिबीराच्या समारोपिय कार्यक्रम मा पुरूषोत्तम बेले उपमुख्याध्यापक राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक यांच्या अध्यक्षे त प्रमुख अतिथी मोतीराम रहाटे अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ कन्हान, रामुजी गि-हे शिक्षक, कमलसिंह यादव पत्रकार , मोहन यादव शिक्षक सहकारी बँक कामठी आदी मान्यवरांच्या हस्ते हस्तक ला स्पर्धेत प्रथम कु मनस्वी कुंभलकर, व्दितीय अन्वेक्षा गाते, चित्रकला स्पर्धेत १) सोनल गंगात्रे २) शारून खोब्रागडे ३) चाहत कश्यप, फँन्सी ड्रेस स्पर्धेत १) प्रताशा नायक २) मोहित मोटवानी , पाककला स्पर्धेत १) गीत कुर्जेकर २) सानवी वानखेडे , भाषण स्पर्धेत १) खुशबु सिंग ठाकुर २) आर्या पोटभरे आदीना बक्षीस व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करून अभिनंदन करण्यात आले. उन्हाळी शिबिराचे महत्त्व सौ आरती बालपांडे हयानी प्रास्तविकातुन स्पष्ट केले. समारोपिय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निकिता बेले व समिक्षा वानखेडे हयानी तर आभार प्रदर्शन वर्षा वाकुडकर नी केले. कार्यक्रमास उज्वला बेले सह मोठय़ा संख्येने पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.