Published On : Fri, May 3rd, 2019

भरचौकात महिलेला मारहाण करून जखमी केले.

कन्हान ला मुलीची वाढु लागली दबंगीरी

कन्हान: आंबेडकर चौकात दोन मुली दुचाकी वाहनाने घसरून पडल्याने समोर उभ्या महिलेला मारहाण करून डाव्या डोळयाला जबर जखमी केल्याने कन्हान पोलीस स्टेशनला दोन्ही विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला .

Gold Rate
16Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,27,600 /-
Gold 22 KT ₹ 1,18,700 /-
Silver/Kg ₹ 1,80,800/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

१ मे महाराष्ट्र दिनी सायंकाळी ५ वाजता दरम्यान आंबेडकर चौक कन्हान येथे फिर्यादी सौ लक्ष्मी संजय पांडे वय ३६ वर्ष रा रामनगर लोहिया लेआऊट कन्हान या आपल्या दुचाकी वाहन क्र एम एच ४० -३७८४ ने टी व्ही रिचार्ज करण्याकरिता उभी असताना आरोपी रेखा गुलाब चौधरी मु गोंडेगाव व मेघा ओमप्रकाश चौधरी मु खदान नं ६ नविन दुचाकी क्र टी सी ५३० मनसर कडे डबल सीट जात असताना आंबेडकर चौका सामोर चारपदरी सिमेंट रस्त्या वरील गिट्टीने स्वत: च दुचाकी चालविता ना घसरून खाली पडल्याने दोन्हीही उठुन सामोरच उभ्या लक्ष्मी पांडे यांचे कडे जावुन विनाकारण हातमुक्याने मारने सुरू केले. फिर्यादी महिलेनी म्हटले की तुम्ही तुमच्या चुकीने पडल्या तरी सुध्दा आरोपी पहिला मुलीने रस्त्यावरील दगड उचलुन जखमी महिलेच्या डाव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले दुसऱ्या मुलीने विधीसंघर्ष बालक हिने शिवीगाळ व धक्काभुकी केली. या मारहाण दरम्यान महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने हिसकुन गहाळ करण्यात आले असल्या चे फिर्यादी जखमी महिला लक्ष्मी पांडे यांच्या तोंडी रिपोर्ट व डॉक्टर रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी भादंवि ३२४, ५०६, ३४ नुसार आरोपी दोन्ही मुली विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास थानेदार काळे व महिला पोलीस अधिकारी दंडवते यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस सुनिता पाल करित आहे .

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात गहुहिवरा रोड बॉयपास उडाण पुलाखाली कॉलेजच्या पाच सहा मुलीचा फ्रि स्टाईल मारपीट चा सोसल मिडिया वर विडिओ वायरल झाला होता. आणि आता भर वर्दळीच्या चौकात दोन मुलीने मारहाण करून महिलेला जखमी केले. यामुळे कन्हान येथे पोलीस प्रशासनाने तारसा रोड चौक व आंबेडकर चौक येथे वाहतुक पोलीस नियमित ठेऊन असामाजिक तत्वावर अंकुश लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Advertisement
Advertisement