Published On : Sat, Dec 29th, 2018

नयाकुंड गावाजवळ पालकमंत्र्यांनी पकडला अवैध कोळश्याचा ट्रक

Advertisement

नागपूर: रामटेक पारशिवनी मार्गावर आमडी फाटा रोडवर नायकुंड गावाजवळ एक अवैध कोळशाचा ट्रक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अचानक धाड टाकून पकडला.

Gold Rate
25 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg 1,15,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा कोळसा महानिर्मितीचा असल्याचे प्रथमिकदृष्ट्या कळते. जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ हा कोळसा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. घटनास्थळाजवळ वजन मापेही आढळून आली आहेत. पेट्रोल पंपा जवळ दररोज दोन तीन ट्रक भरले आणि उतरवले जातात. जवळच असलेली कोळश्याची  खदान सुरू झाली तेव्हांपासून हा अवैद्य कोळसा विकला जात असल्याचे यावेळी लोकांनी सांगितले. ट्रकचालक ही गाडी महानिर्मितीची असल्याचे सांगत होता.

पालकमंत्र्यांनी पारशिवणी पोलिसांना बोलावून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून ट्रकसह कोळसा जप्त करून चालकाला अटक करण्याचे निर्देश दिले.

घटनास्थळी यावेळी पालकमंत्र्यांसोबत आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आ आशिष जयस्वाल, योगेश वाडीभस्मे व अन्य उपस्थित होते.

Advertisement
Advertisement