Published On : Fri, Dec 28th, 2018

पिंडकापार ग्रामपंचायत उपसरपंचपदी गौतम पौणिकर

Advertisement

विविध पक्षाचे दावे प्रतिदावे

रामटेक : रामटेक तालुक्यात नुकतेच उपसरपंच निकाल जाहीर करण्यात आले. नवनिर्वाचित उपसारपंचा मध्ये रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत पिंडकापार सोनपूर मध्ये उपसरपंदी गौतम पौनिकर यांची नियूक्ती करण्यात आली त्यांच्या सोबत बाकी सदष्य आकाश चाफले, सुलोचना कोहळे, छबिबाई परिहार, अनुराथा चौधरी, प्रतीभा धुर्वे यांची निवड करण्यात आली.

Gold Rate
05 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,700 /-
Gold 22 KT ₹ 93,700/-
Silver/Kg ₹ 1,13,200/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यात उपसरपंच पदाकरिता मतदान करून आपल्या पसंतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याकरिता धावपड सुरू असल्याचे चित्र निदर्शनास आले. उपसरपंच पदावर कुणाची वर्णी लागणार याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले होते.उपसरपंच आपलाच बनला पाहिजे ह्याकरिता विविध पक्षाचे नेत्यांचे दावे प्रतिदावे सुरू होते.

ह्यावेळी भाजपचे सक्रिय नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर रहांगडाले यांनी अथक परिश्रम घेतले ह्यावेळी गंगाधर झाडे, मुरली रहांगडाले ,प्रकाश चाफले,निलू समर्थ, कांतिलाल पटले,दिलीप मानकर, हरिचंद डोंगरे,श्री मुलचंद येलमुले,चिंधू मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपल्या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement