Published On : Mon, Dec 3rd, 2018

“महायुतीच्या वचननाम्याची होळी आंदोलन” “देता कि जाता?” – धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चा इशारा

Advertisement

धनगरांना अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून होणारा विलंब धनगर जमातीच्या संयमाचा अंत बघणारा आहे.गत लोकसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने धनगर आरक्षणाबाबत लिखित आश्वासन दिले; या वचननाम्यात ‘मेंढपाळ आयोग’ (शेफर्ड कमिशन) ची स्थापना करण्याचे हि आश्वासन दिले होते. मात्र या दोन्ही बाबींवर काहीही कारवाई झाली नाही. त्यानंतरही सरकारने वारंवार आरक्षण देऊ असेच सांगितले. टीस चा अहवाल येऊन तीन महिने झाले मात्र त्यावर काही कारवाई झाली नाही. याउलट मराठा आरक्षणाबाबत सरकारने तत्परता दाखविली. आता तर पुढील अधिवेशनापर्यंत धनगर आरक्षणाचा विषय पुढे ढकलला आहे. हे आता खपवून घेतले जाणार नाहीअसा इशारा धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष खासदार व पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ डॉ. विकास महात्मे यांनी दिला आहे. ६५ वर्षे काँग्रेस आघाडी सरकारने धनगरांना ST आरक्षणापासून वंचित ठेवले. विद्यमान युती सरकारने आरक्षण अंमलबजावणी करण्याची मानसिकता वेळोवेळी दाखविली परंतु अद्याप राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे शिफारस पत्र ही पाठविले गेले नाही.

संपूर्ण धनगर जमातीचे आराध्य दैवत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत तसेच धनगरांचे प्रेरणास्थान व स्फूर्तीस्थान महाराजा यशवंतराव होळकर आहेत. ३ डिसेंबर ला यशवंतराव होळकर या झुंझार लढवय्या धनगर राज्यकर्त्याची जयंती आहे. धनगर आरक्षण अंमलबजावणी वर तत्काळ कारवाई व्हावी यासाठी एक लक्षवेधी आंदोलन प्रत्येक जिल्हा पातळीवर करण्यात आले. या आंदोलनात प्रत्येक जिल्ह्यात महायुती ने दिलेल्या वचननाम्याची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवार दिनांक ३ डिसेंबर ला महाराजा यशवंतराव होळकर जयंती दिनी राज्यभरात एकाच वेळी महायुतीच्या वचननाम्याची होळी करून हे आंदोलन झाले. यामध्ये सरकारने विनाविलंब वचनपूर्ती केली नाही तर गंभीर परिणाम होतील हा संदेश या आंदोलनातून सरकारला देण्यात येईल.

यामध्ये स्वतः मा. खासदार डॉ. विकास महात्मे, मुंबईला, मुलुंड (पूर्व), च्या इस्टर्न एक्स्प्रेस हाय वे वरील टोल नाक्याजवळ, म्हाडा चौकात दुपारी १२ वाजता या आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच नागपूर येथे भा.ज.पा. शहर अध्यक्ष मा. आमदार श्री. सुधाकरराव कोहळे यांचे घराजवळ, उदय नगर चौक, रिंग रोड, नागपूर येथे समितीचे सचिव श्री हरीश खुजे यांचे नेतृत्वात आंदोलन झाले. त्यात मधुकर अवझे, मधुकर काळमेघ, तुलसीराम आगरकर, सुभास बुधे, डॉ.विनोद बरडे, श्री शरद उरकुडे, सौ वंदना बर्डे, सौ खुजे ताई, सौ तांबडेताई, श्री निखाडे, श्री ताबंडे, उमेश अवघड, दीपक टापरे, राम लोही,धनंजय साटकर, प्रशांत खुजे, बबलू भुजाडे, वासुदेव चीव्हाने, प्रशांत बेहकर, सुभाष निन्गोट, प्रशांत निवांत इत्यादि समाज बांधव उपस्थित होते.

Advertisement
Advertisement