Advertisement
नरकेसरी बॅरि.मोरुभाऊ अभ्यंकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त प्रभाग क्र.२२ च्या नगरसेविका व जलप्रदाय समिती उपसभापती श्रीमती श्रध्दा पाठक यांनी महाल नगरभवन जवळील बॅरि. अभ्यंकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला सकाळी नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी अभ्यंकर परिवारातील श्री.सुधीर अभ्यंकर, भा.ज.पा. क्रीडा आघाडीचे श्री.पियुष अंबुलकर, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक, राजेश घोडमारे, शंकर बिज्वे, ए. झेड खान, मोहम्मद जमील आदी उपस्थित होते.