Published On : Thu, Jun 14th, 2018

कोलकात्याच्या समुद्रात मालवाहू जहाजाला भीषण आग

कोलकाता : कृष्णपट्टम येथून कोलकात्याला जात असलेल्या एमव्ही एसएसएल या मालवाहू जहाजातील कंटेनरच्या स्फोटामुळे भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस राजकिरण हे जहाज आणि डॉर्निअर हे विमान कर्मचाऱ्यांच्या बचावासाठी रवाना केलं आहे.

आतापर्यंत या जहाजावरच्या 22 क्रू मेंबरपैकी 11 क्रू मेंबर्सना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आलं आहे. इतर क्रू मेंबरना वाचवण्याचे तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरु आहेत.

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पश्चिम बंगालच्या हल्दियापासून सुमारे ६० नॉटिकल्स माईल्स अंतरावर हे जहाज होतं. जहाजाच्या डेकवर बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका कंटेनरचा स्फोट झाला आणि त्यानंतर जहाजाला भीषण आग लागली

Advertisement
Advertisement