Published On : Wed, Jun 6th, 2018

राज ठाकरेंना सापडली अमित शहांची ‘बकेट लिस्ट’; बघा काय-काय आहे त्यात!

मुंबई: भाजपा अध्यक्ष अमित शहा सध्या देशभरातील प्रख्यात व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. ‘संपर्क फॉर समर्थन’च्या माध्यमातून देशातील 1 लाख लोकांच्या भेटी घेण्याचा शहांचा संकल्प आहे. शहांच्या याच भेटीगाठींवर मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. ज्या व्यक्तींना भेटायचं आहे, त्यांची एक भलीमोठी यादी अमित शहांच्या हातात आहे, असं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं आहे.’बकेट लिस्ट?’, अशा शब्दांमध्ये राज यांनी ठाकरी शैलीत शहांवर शरसंधान साधलं आहे. शहा बकेट लिस्ट पाहण्यात व्यस्त असल्यानं भाजपा कार्यकर्त्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून केला आहे.

‘संपर्क फॉर समर्थन’च्या माध्यमातून सध्या अमित शहा अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या भेटीगाठी घेत आहेत. आज अमित शहांनी मुंबईत अभिनेत्री माधुरी दीक्षित, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. थोड्याच वेळात शहा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. याच भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी एक व्यंगचित्र रेखाटलं आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामध्ये अमित शहांच्या हातात एक भलीमोठी यादी देण्यात आली आहे. यामध्ये माधुरी, लतादीदी, कपिल देव, उद्धव, मिल्खासिंग यांची नावं आहेत. ही यादी इतकी मोठी आहे की त्यामुळे समोर उभा असलेला भाजपाचा कार्यकर्ता शहांना दिसतही नाही, असं राज यांनी व्यंगचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रख्यात लोकांच्या भेटी घेणाऱ्या अमित शहांना भेटीगाठीतून भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी वेळ नाही, असं राज यांनी यातून दाखवलं आहे.

Advertisement
Advertisement