Published On : Wed, Jun 6th, 2018

नवेगाव-खैरी येथील पंपिंग बिघाड व गोरेवाडा तलावाच्या पातळीतील घट यामुळे शहराचा पाणीपुरवठा बाधित

Advertisement

नागपूर: मंगळवार दुपारपासून नवेगाव-खैरी हेडवर्क्स येथे झालेल्या बिघाडामुळे तसेच गोरेवाडा तलावाच्या घटलेल्या पातळीमुळे (३१३.१२मी; दुपारी २ वाजता) शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असून येते काही दिवस परिस्थिती अशीच राहण्याचे संकेत आहेत.येथे उल्लेखनीय आहे कि, ‘फोर पोल’ संरचना कोसळल्यामुळे ५ जून रोजी दुपारी ४ वाजेपासून गोधनी येथील पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र व गोरेवाडा तलाव यांचा कच्च्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला होता.

परिणामी पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाण्याचा पुरवठा पूर्ण बंद असून गोरेवाडा पेंच १, २ व ३ केंद्रातून तलावातील घटलेल्या पातळीमुळे मर्यादित पाणीपुरवठा होत आहे.तसेच गोरेवाडा तलावातील पातळी आणखी कमी होत असल्याने गोरेवाडा (पेंच १, २, ३) येथे गुरुत्वाकर्षणाने होणारा पुरवठा कमी झाला आहे. पेंच १, २, ३ येथील कच्च्या पाण्याच्या इनलेट्समध्ये अनुक्रमे ७२००, ५५०० व ४१०० मी३ इतका पुरवठा आहे.एकूण मिळत असलेले कच्चे पाणी १६७०० मी३ इतके असून एकूण गरजेच्या २०००मी३/तास ने कमी आहे. त्यामुळे पेंच ३ येथील चौथा पंप व पेंच २ येथील तिसरा पंप कार्यन्वित होऊ शकत नाही.

यामुळे राजभवन, सेमिनरी हिल्स व गिट्टीखदान जलकुंभांच्या पातळीत घट झाली आहे.तसेच पांडे लेआऊट फीडर मेन पाइपलाइन व बर्डी फोर्ट जलकुंभ यांना होणारा पुरवठा अपेक्षेपेक्षा कमी आहे. यासर्वांच्या परिणामस्वरूप शहराच्या पश्चिम, मध्य व दक्षिण भागांना मर्यादित पाणीपुरवठा होत आहे.येथे उल्लेखनीय आहे कि गोधनी येथील शटडाऊनमुळे ११०MLD शुद्ध पाणी कमी मिळत असून त्यामुळे राजभवन जलकुंभाची पातळी बाधित झाली आहे व गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असलेल्या