Published On : Wed, Jun 6th, 2018

ईक्बाल बोहरी आणि मुकेश खुल्लर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी

मुंबई: निवृत्त जिल्हा न्यायाधीश ईक्बाल बोहरी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली असून त्यांना आज ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Gold Rate
28 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,21,000 /-
Gold 22 KT ₹ 1,12,500 /-
Silver/Kg ₹ 1,46,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंत्रालयात पार पडलेल्या या शपथविधी कार्यक्रमाला मुख्य सचिव दिनेश कुमार जैन,एमईआरसीचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यूपीएस मदान, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एस. संधू, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्याम लाल गोयल,ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह विविध विभागाचे सचिव, विद्युत नियामक आयोग आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement