Published On : Sat, Jun 2nd, 2018

भारत ग्रोथ इंजिन झाला आहे- नितीन गडकरी

Advertisement

पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले दिसतात मात्र तेल, कांदा आणि साखरेचे स्थिर भाव दिसत नाहीत

नागपूर: भारत ग्रोथ इंजिन झाला आहे अशा शब्दात देशातील विकासाची घोडदौड व्यक्त करताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाचा परामर्श घेतला. नागपुरात आयोजित पत्रपरिषेदत त्यांनी भाजपप्रणीत सरकारच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला.

Gold Rate
23 July 2025
Gold 24 KT 1,00,900 /-
Gold 22 KT 93,800 /-
Silver/Kg 1,16,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या पण त्यांच्या काही समस्या कायम आहेत. उत्पादन वाढले असले तरी योग्य दर मिळत नाही याचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही परिणाम होतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले दिसतात मात्र तेल, कांदा व साखरेसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर असल्याचे विरोधकांना दिसत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला. (सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत)

Advertisement
Advertisement