Published On : Thu, May 3rd, 2018

विधानपरिषद निवडणूक: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा भाजपकडून रामदास आंबटकर,लातूर राष्ट्रवादीला, परभणी काँग्रेसला

Advertisement

मुंबई: विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर यांना उमेदवारी दिली तर, काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळ रात्रीपर्यंत सुटला नाही.

भाजपकडे असलेल्या या मतदारसंघातून मावळते आमदार मितेश भांगडिया यांचा पत्ता साफ करण्याचे संकेत पक्षाने बरेच आधी दिले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी, अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं घोडं गंगेत न्हालं आहे. दोन्ही पक्षांनी आघाडी करण्याचं निश्चित केलं आहे.

ज्या उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेवरुन आघाडी अडली होती, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडली आहे.

त्याबदल्यात परभणीची जागा काँग्रेसला मिळाली आहे.

त्यामुळे आता उस्मानाबाद-बीड-लातूर मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले रमेश कराड हे आघाडीचे उमेदवार असतील.

नव्या समीकरणानुसार कोकण, नाशिक आणि लातूर या तीन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत, तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार देईल.

आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 21 मे ला मतदान आहे.

आघाडीचे उमेदवार

उस्मानाबाद-बीड-लातूर – रमेश कराड (राष्ट्रवादी)

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

नाशिक – शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली –

परभणी-हिंगोली –

अमरावती –

विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे उमेदवार

विपुल बजोरिया – हिंगोली-परभणी

नरेंद्र दराडे – नाशिक

राजीव साबळे- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग

21 मे रोजी मतदान, 24 मे रोजी निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थांतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 मे अंतिम तारीख आहे.

21 मे रोजी मतदान होईल, तर 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement