Published On : Fri, Apr 6th, 2018

आम्ही आरक्षण कधीही हटवणार नाही आणि कोणाला हटवू देणार नाही – अमित शाह

मुंबई: भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय.

भारतीय लोकशाहीच्या इतिहासात भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वाधिक बलिदान दिले आहे. आज मोदींच्या नेतृत्वात देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कमळ फुललेले दिसतंय. हा अत्यंत कठिण प्रवास होता. कार्यकर्ते आणि नेत्यांनी कठोर परिश्रम घेतल्यामुळे आज हा दिवस दिसू शकला असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दहा सदस्यांनी सुरु झालेल्या भाजपाचे आज ११ कोटी सदस्य आहेत. भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. गरीबाच्या कल्याणासाठी सत्तेला साधन बनवण्याचा आमचा विचार आहे असे अमित शहा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबाच्या घरात सुख पोहोचवण्याचे काम केले. सबका साथ, सबका विकासाचे सूत्र साकार केले.

राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पवार साहेबांसोबत बसत आहेत. काँग्रेसने देशासाठी काय केले ? राहुल बाबा तुम्ही साडेचारवर्षांचा हिशोब मागता ? देशाची जनता तुमच्याकडे चार पिढयांचा हिशोब मागतेय. तुम्ही इतकी वर्षा सत्ता असून काय केले ? नरेंद्र मोदींनी उज्वल योजना, मेडिक्लेम अशा योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांपर्यंत लाभ पोहोचवले असे अमित शाह म्हणाले.

रोज सीमेवर हल्ले होत असताना, जवानांची मुंडी छाटली जात होती. त्यावेळी सरकारला काही फरक पडत नव्हता. पण आम्ही उरीचा बदला घेतला. संपूर्ण जगात एक वेगळा संदेश गेला. देशाकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला असे अमित शाह म्हणाले. राहुल गांधी, पवार कान खोलून ऐका, आम्ही आरक्षण हटवणार नाही आणि तुम्हाला हटवू देणार नाही असे अमित शाह म्हणाले.


आम्ही संसदेत सर्व मुद्यांवर चर्चा करायला तयार होतो पण विरोधकांनी संसद चालू दिली नाही असे शाह म्हणाले. आम्ही उत्तर प्रदेशात पोटनिवडणूक हरलो पण राहुल गांधी तुमच्या पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. हे लक्षात घ्या. आम्ही दोन जागा गमावल्या पण ११ राज्यात तुम्हाला आम्ही सत्तेवरुन हटवले असे अमित शाह म्हणाले.

मोदी आणि फडणवीस सरकारवर कोणीही एक आरोप करू शकलेलं नाही. शेतकरी आत्महयेचा आकडा फडणवीस सरकारच्या राज्यात कमी झाला. खूप मोठा पूर आला की सगळं उद्धवस्त होत तेव्हा सगळे एकाच झाडावर चढतात. तसेच सगळे विरोधक मोदींच्या पुराला घाबरले आहेत. 2019 ची निवडणूक खोट्या अश्वासनावर जिंकायची नाहीय. आपली काम लोकांपर्यंत पोहोचवा. 2019 च काऊंटडाऊन सुरू झालायं असे शहा म्हणाले.

Advertisement
Advertisement