Published On : Wed, Feb 21st, 2018

कामाच्या शोधात आला अन् चोर झाला

Crime
नागपूर: जन्मापासून कोणीच वाईट, चोर, गुन्हेगार नसतो. परिस्थिती आणि जबाबदारीमुळे तो बदलत जातो. वेळ प्रसंगी चोरीचा मार्गही पत्करावा लागतो. अशीच काहीशी स्थिती नागपुरात कामाच्या शोधात आलेल्या एका कुटुंब प्रमुखावर आली. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तो नागपुरात आला. मात्र, काम मिळाले नाही, आता जगायचे कसे आणि कुटुंबाला जगवायचे कसे असा प्रश्न त्याच्या समोर उभा झाला. कुठलाही पर्याय नसल्याने चक्क त्याने चोरी केली. चोरी करुन बाहेर रेल्वे स्थानकाबाहेर पडत असतानाच तो आरपीएफच्या जाळ्यात अडकला.

चंदन राजेंद्रसिंग ( ३१, रा. एकता कॉलनी, देसाईगंज, वडसा) असे त्याचे नाव आहे. त्याला पत्नी, दाने मुले, आई-वडिल आहेत. वडिल एका कागद कंपनीत कामाला होते. कामावर असताना एक हात कटल्याने ते अपंग झाले. काम बंद झाल्याने त्या कुटुंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. आता घरातील संपूर्ण जबाबदारी चंदनसिंगवर आली. कुटुंबाचे हाल पाहून होत नसल्याने तो घराबाहेर पडला. कामाच्या शोधात दोन दिवसांपूर्वीच नागपुरात आला. येथील एमआयडीसी परिसरात काम शोधत होता. मात्र, काम मिळाले नाही. त्याच्या समोर स्वत:चा पोट भरण्याचा प्रश्न उभा ठाकला. मंगळवारी सायंकाळी तो नागपूर रेल्वे स्थानकावर आला. पश्चिम प्रवेशव्दाराशेजारीच प्रतिक्षालात गेला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास सारे झोपेत असताना त्याने सीआरपीएफ जवान दिपककुमार ब्रम्हा (३९) या सीआरपीएफ जवानाची ट्राली बॅग चोरली.

दिपककुमार यांची पोस्टिंग गडचिरोलीत (बटालियन १९२) आहे. त्याला मुख्यालयी म्हणजे मुंबईला जायचे होते. त्यामुळे तो रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर आला. मात्र, उशीर झाल्याने तो प्रतिक्षालयात थांबला. तो साखर झोपेत असताना चंदनने त्याची भली मोठी ट्राली बॅग चोरली. दरम्यान कर्तव्यावर असलेले आरक्षक शशीकांत गजभिये आणि जाहिद खान गस्तीवर असताना चंदन संशयीतरित्या आढळला. मोठी ट्राली बॅग घेवून तो स्टेशन बाहेर जात होता.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संशयाच्या आधारावर ठाण्यात आणले. उपनिरीक्षक होतीलाल मीणा यांनी त्याची कसून चौकशी केली अहता सारा प्रकार उघडकीस आला. लगेच त्याला घटनास्थळी आणले. मात्र, सीआरपीएफ जवान तिथे नव्हते. आरपीएफने पुढील चंदनसिंगला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले. दरम्यान दिपककुमार आरपीएफ ठाण्यात आले. बॅग चोरीची घटना सांगत असतानाच समोर असलेली बॅग आपलीच असल्याचे त्यांनी सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी दिपककुमारची तक्रार नोंदवून घेतली.

Advertisement
Advertisement