Published On : Tue, Feb 6th, 2018

शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणादायी राष्ट्रीय स्मारकासाठी सविस्तर आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Advertisement

मुंबई: स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक सर्वांना प्रेरणा मिळेल असे उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करुन शासनाला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आदी या बैठकीस उपस्थित होते. महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.

Gold Rate
Feb 19th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,000 /-
Gold 22 KT ₹ 1,45,100 /-
Silver/Kg ₹ 2,49,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement