Published On : Wed, Nov 29th, 2017

राज्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे – मुख्यमंत्री

Advertisement

Hon CM with Sweden Deligation 1
मुंबई:
पर्यावरणाच्या दृष्टीने स्मार्ट सिटी महत्वाच्या असून राज्यातील प्रकल्पांसाठी स्वीडनने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

स्वीडन देशाचे स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा आयव्हीएल संस्थेचे उपाध्यक्ष ओस्टेन इकेनग्रेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, स्वीडन पर्यावरण संशोधन संस्थेच्या व्यवसाय विकास आणि विपणन व्यवस्थापक रूपाली देशमुख, नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव, कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटी उभारण्याठी नियोजन करताना सांडपाणी व घनकचऱ्याचे पुनर्विघटन करून ऊर्जा निर्मितीवर भर देण्यात येत आहे. घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचे काम पुण्यात सुरू आहे. नागपूर व नवी मुंबई येथेही हे प्रकल्प करण्याचा मानस आहे. या प्रकल्पांच्या आखणीसाठी व अंमलबजावणीसाठी स्वीडनने सहकार्य करावे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या चर्चेदरम्यान बोलताना उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी औद्योगिक पर्यावरण चांगले राखले जावे. तसेच पाण्याच्या बाटल्यांचे पुनर्विघटन करण्यासाठी मंत्रालय व सार्वजनिक ठिकाणी बाटल्यांचे व्हेडिंग मशिन ठेवण्याची गरज विषद केली.

ओस्टेन इकेनग्रेन म्हणाले, ‘मेक इन महाराष्ट्र’ मध्ये काम करण्यास उत्सुक आहोत. पुनर्विघटनाचे काम स्वीडनमध्ये 98 टक्के झाले आहे. आमचा भर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचऱ्यातून वीज निर्मितीवर आहे. आमची आयव्हीएल कंपनी आधुनिक तंत्रज्ञानावर भर देऊन स्मार्ट सिटीतील शहरांचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासन ते स्वीडन शासन यांच्यातील परस्पर सहकार्य वाढावे, यासाठी राज्य शासनाने दाखविलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Advertisement
Advertisement