नागपूर: सध्या हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे. अभ्यासपूर्ण झाल्यानंतर स्पर्धात्मक तयारीकरिता विद्यार्थी हा सज्ज होतो. त्यासाठी एकांत व अभ्यासाचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय आहे. सध्याच्या घडीला वैज्ञानिक दृष्ट्या सर्वभौम्य असलेल्या बौद्ध संस्कृतीबाबतचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी विहार हे प्रभावी ठिकाण आहे. त्यामुळे शैक्षणिक उत्थानाकरिता विहार तेथे ग्रंथालय ही संकल्पना प्रभावी आहे. असे प्रतिपादन पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) व नागालँड सरकारचे मुख्यमंत्री यांचे विशेष सल्लागार संदीप तामगाडगे यांनी केले. ते रामेश्वरी, काशीनगर येथील सम्राट अशोक बुद्ध विहार वर्षावास समाप्ती व राष्टÑपिता महात्मा फु ले वाचन कक्षाच्या उद्घाटन कार्यमात मार्गदर्शन करीत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी एन. ए. ठमके, रमेश चहारे आणि अध्यक्षस्थानी गुलाब हुमणे यांची उपस्थिती होती. डीआयजी तामगाडगे पुढे म्हणाले की, या संकल्पनेतून विहारात जाण्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणार. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वज्ञान व मार्गदर्शनाची खरी जाणीव अभ्यासवर्गामुळे होतील. आणि विद्यार्थी पुढील यशाची शिखरे निर्भिडपणे गाठू शकतील.यानंतर विद्यार्थी व पालकांशी त्यांनी संवाद साधला. मुलांना प्रशासकीय अधिकारी व इतर स्पर्धा परीक्षेमार्फत अधिकारी कसे बनता येईल स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी कोणता अभ्यासक्रम निवडावा याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. तर ठमके यांनी अभ्यासीका हा उपक्रम विद्यार्थी पालक तथा समाजासाठी हितकारी आहे. तसेच समाज व धम्माची ओढ कायम राहणार असेही त्यांनी सांगितले.
यापूर्वी सकाळी आठला भंदत प्रियदर्शी महाथेरो व भंते विनयकिर्ती याच्या हस्ते पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर परित्राण व सामुहिक वंदनेनंतर राष्ट्रपिता ज्योतीबा फुले वाचनालयाचे उदघाटन डीआयजी संदीप तामगाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तामगाडगे यांना समितीच्या वतीने सचिव भूषण भस्मे व इतर सदस्यांनी मानपत्र देऊन त्यांचा सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भूषण भस्मे यांनी केले तर आभार भीमराव मगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणबाजी शंभरकर, पंढरी ढाकणे, वसंत कांबळे, कृष्णा नगरारे, घनश्याम खडतकर, डॉ. मधुकर मुन, धनराज गोटेकर, अशोक कांबळे, अशोक नरांजे, चंद्रकला दुपारे, अनीता कांबळे, ज्योती झोडापे, निशा गायकवाड, सुजाता नरांजे, रजनी पाटील, पोर्णीमा मस्के, इंदिरा गजभिये, सुनिता मगरे, पूजा भस्मे, कुंदा नगरारे, पूजा पीयूष पाटील, धाबर्डे, वासनिक यांनी मोलाचे सहकार्य केले. सामुहिक भोजनदानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.