कन्हान :सार्वजनिक वाचनालय राजीव गांधी बालोद्यान, हनुमान नगर कन्हान येथे परिसरातील १० व १२ च्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा व वाचक मेळाव्याचे आयोजन करून थाटात साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे सार्वजनिक वाचनालय राजीव गांधी बालोद्यान, हनुमान नगर कन्हान येथे परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार व वाचक मेळावा शनिवार दि ०७ऑक्टो.२०१७ ला सायंकाळी ६ वाजता प्रमुख अतिथी उपाध्यक्ष जि.प. नागपूर मा शरद डोणेकर यांच्या हस्ते व नगर सुधार समिती अध्यक्ष सौ छायाताई नाईक यांच्या अध्यक्षेत वाचक मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कन्हान -पिपरीचे नगराध्यक्ष मा.शंकरभाऊ चहांदे, उपाध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, नगरसेविका वैशाली डोणेकर, लक्ष्मीताई लाडेकर, मा.माणिकराव वाघधरे माजी मुख्याध्यापिका वेणुताई बारई, सार्वजनिक वाचनालय अध्यक्ष वासुदेवराव चिकटे,प्राचार्या वर्षा शिंगाडे, मुख्याध्यापिका बोरकर मॅडम आदीं प्रामुख्याने उपस्थित होते.
वाचनालया तर्फे पुस्तक व पुष्पगुच्छाने मान्यवरांचे स्वागत करून इय्यता १० वी मध्ये परिसरातुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विध्यार्थ्याचा गौरव करण्याची ३५ वर्षाची परंपरा वाचनालयाने कायम ठेवत एसएससी मार्च २०१७ मध्ये सर्वप्रथम आलेल्या अकुंश दिनकर इंगळे, कुमारी भावना नरेश कारेमोरे बी.के.सी पी स्कुल कन्हान यांचा नगराध्यक्ष मा. शंकरभाऊ चहांदे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व एच एस सी मार्च २०१७ मध्ये कला शाखेतील प्रशांत सुर्यभान धावडे भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविधालय कन्हान, वाणिज्य शाखेत कु. स्वेता संजय चव्हाण श्री नारायणा विध्यालय कन्हान व विञान शाखेतील अभय ईश्वर कडबे मारोतराव पानतावणे कनिष्ठ महाविद्यालय कांद्री कन्हान हयाना स्व. श्री विठ्ठलराव नाईक संस्थापक अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय यांचे स्मुती प्रित्यर्थ स्मुतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच सभासद व वाचकाकरिता आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम शंकर धावडे, व्दितीय वैभव वांढरे, तृतिय सुजित बागाईतकार स्व. भास्करराव फरसोले स्मुती प्रित्यर्थ प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते स्मुतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्तविक वाचनालयाचे सचिव श्री मनोहरराव कोल्हे यांनी केले.सुत्रसंचालन प्रा.चंद्रकांत पी.जुळे यांनी तर आभार श्री दिनकरजी मस्के हयानी व्यकत केले.महाप्रसाद व दुध वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमास प्रभाकर महाजन, मधुकर उराडे , प्रकाश नाईक, सुनिल लाडेकर, खंडाईत सर,गायधने सर, लाखपाले सर, रतन रेखाते,प्रा. जाधव,मिलींद वाघधरे, कमलसिंह यादव,अशोक लेकुरवाळे,गजेंद्र गिरडकर,श्याम बारई,नितीन नाईक,रामराव धावडे,सचिन काळे,युवराज भोंगाडे, सौ.कुंभलकर ताई माहुरकर मँडम, गजबे मँडम प्रामुख्याने उपस्थितीत असुन परिसरातील वाचक,विद्यार्थी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने कार्यक्रमास उपस्थितीत राहुन मौलाचे सहकार्य केले.